कल्याण – कल्याण पश्चिमेतील उपासदन बिल्डींग आणि अरसिया अल्टीज बिल्डींग मध्ये संकल्प फायनान्स कंपनीने सुरू होती , रोलिंग स्कीम व्दारे अनेक प्रलोभन देऊन ४० ठेवीदारांच्या पर्सनल लोन मधून लाखो रुपये परस्पर काढून घेतल्याने तब्बल ६ कोटी ४२ लाख रक्कमेची फसवणूक केल्या प्रकरणी सहाआरोपींना अटक करून त्यांच्या कडून चार कोटी वसुली करण्यात बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या तपास अधिकाऱ्यांना यश आले आहे त्याबाबत पत्रकार परिषदेत उपायुक्त विवेक पानसरे गुन्ह्याबाबत माहिती दिली
कल्याण पश्चिमेतील बाजारपेठ पोलीस ठाण्यात अक्षय विकास माने (३२) आणि ४० ठेवीदार यांच्या तक्रारी नुसार संकल्प फायनायन्सच्या अधिकारी आणि कर्मचारी सहा ,सात जणांवर ठेवीदारांच्या पर्सनल लोन मधून लाखो रुपये अकाऊंट मधून परस्पर काढून फसवणुक केल्या प्रकरणी बाजार पेठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते त्या प्रकरणी १ हेमलता महादेव कांबळी (५१ ) सुप्रिया वसंत गुरव उर्फ सुप्रिया संदीप शेरेकर, (३३) राहणार उपवन बेलवली बदलापूर , ३ ) तन्मय विवेक देशमुख (२७) राहणार , शिवशक्ती कॉम्प्लेक्स बदलापूर ४) वृषाली विनायक पवार (२९), राहणार कांचन कॉलनी काटे मानिवली रोड विठ्ठल मंदीर, ५) अभिजित जयवंत गुरव (३४) उपवन बेलवली बदलापूर , ६) राहुल सुरेश कोळगे(२१) रा. गडकरी रोड डोंबिवली पूर्व , ७) मितेश प्रकाश कांबळे (२९)रा. रिजेसी सर्वम टिटवाळा यांच्या मालमते जंगम मालमत्ते वर कारवाई करून तब्बल ३ कोटी ९५ लाख , १८ हजार रुपये पोलिसांनी मोठ्या कौशल्याने वसुली केली आहे . यांच्यावरअटक करून गजाआड केले आहे . याबाबत पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली यावेळी सहायक पोलीस आयुक्त अनिल पोवार , आणि बाजारपेठ पोलीस निरीक्षक यशवंत चव्हाण उपस्थित होते आणि तपास अधिकारी दिलीप फुलपगार सहायक पोलिस निरीक्षक अविनाश बनवे पोलीस उपनिरीक्षक शुभांगी पवार , राज गुरू , गायकवाड चव्हाण, पंकज परदेशी इत्यादी अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांनी या गुन्ह्यात उत्तम काम केल्याची माहिती देण्यात आली आणि फिर्यादी च्या समाधानाची बाब म्हणजे आरोपी कडून तब्बल चार कोटी रुपयांची वसुली पोलिसांनी केली आहे. पोलिसांची हि कामगिरी खूप कौतुकास्पद आहे.