डॉ.श्रीकांत शिंदे फौंडेशनकडून कोरोनामुळे निधन झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना मदत

प्रतिनिधी.

मुंबई कोरोना साथीच्या संकट काळात आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या पत्रकारांना आपले प्राण गमवावे लागले. या पत्रकारांच्या कुटुंबियांना डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून आर्थिक मदत करण्यात आली. मंत्रालयातील दिवंगत पत्रकारांच्या कुटुंबीयांच्या उपस्थित दिवंगत पत्रकार बांधवांचे धनादेश पत्रकार संघटनेच्या प्रतिनिधींकडे सुपूर्द करण्यात आले. मंत्रालयातील जेष्ठ पत्रकार स्व.जयंत करजवकर, मुंबई कार्यालयात काम करणारे न्युज18 लोकमतचे पत्रकार स्व.विठ्ठल मांजरेकर तसेच संभाजीनगर येथील सामनाचे पत्रकार स्व.राहुल डोलारे यांच्या कुटुंबियांना मदत करण्यात आली. यासमयी मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, उपाध्यक्ष दिपक भातुसे, माजी कार्यवाह प्रमोद डोईफोडे, सोनू श्रीवास्तव तसेच इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रतिनिधी मयुरेश गणपते, राजू सोनवणे तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्षप्रमुख मंगेश चिवटे उपस्थित होते.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web