डॉक्टरांची बोगसगिरी, बोगस मृत्यू दाखले देणारे तीन डॉक्टर गजाआड

कल्याण प्रतिनिधी  : शासकीय डॉक्टरांच्या नावाने बनावट मृत्यू दाखल  देणाऱ्या तीन डॉक्टरांना  कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. एका कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूनंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे त्यामुळे डॉक्टरी पेशाल काळिमा पासण्याचे काम या डॉक्टरांनी केले आहे ही घटना कल्याण डोंबिवली आणि परिसरात चर्चेचा विषय बनली आहे.
कल्याण पूर्वेतील साई स्वास्तिक या खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला. यानंतर रुग्णालय व्यवस्थापनाने या व्यक्तीचा मृत्यूदाखला नातेवाईकांच्या हाती दिला. काही दिवसानंतर ही बाब समोर आली की, मृत्यू दाखल्यावर ज्या डॉक्टरची सही आणि शिक्का आहे, तो डॉक्टर या हॉस्पिटलमध्ये कार्यरतच नाही.ही बाब उल्हासनर सेंट्रल हॉस्पिटलचे डॉक्टर अरुण चंदेल यांना माहिती झाली. डॉक्टर चंदेल यांच्या नावावर बनावट मृत्यूदाखला दिला गेला होता. याप्रकरणी डॉक्टर चंदेल यांनी साई स्वास्तिक हॉस्पिटलच्या चार डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी किरण वाघ यांनी हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.या प्रकरणी चारपैकी तीन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. डॉ. तुषार टेंगे, डॉ. स्वप्नील मुळे, डॉ. सतीश गिते या तिघा डॉक्टरांना पोलिसांनी कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालायने तिघांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या डॉक्टरांच्या कारनाम्यामुळे डॉक्टरी पेश्याला काळिमा फासला गेल्याची घटना घडली.त्यामुळे पैश्यांच्या मोहापायी डॉक्टरी पेशाची विश्वासार्हता नष्ट करण्याचे काम करण्यात आले आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web