सावित्रीबाई फुले ब्रिगेड महिला संघ व महिला उद्योग केंद्राचे उद्घाटन 

प्रतिनिधी.

भिवंडी – भिवंडी तालुक्यातील अनेक गावांचा केंद्रबिंदू असलेला पडघा व कल्याण तालुक्यातील  खडवली येथे सावित्रीबाई फुले ब्रिगेड महिला संघ कार्यालयाचे व महिला उद्योग केंद्राचे नुकतेच उद्घाटन पडघा ग्रामपंचायत प्रभारी सरपंच श्वेता बिडवी व माजी उपसरपंच गुरुनाथ मोरे संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष सतीश पाटील, ठाणे जिल्हा सचिव  विकासनागरे पाटील,
सावित्रीबाई फुले ब्रिगेड महिला संघ संस्थापिका अध्यक्षा पुष्पाताई राणे, मंगेश जोशी,युवा कवी मिलिंद जाधव  यांच्या हस्ते करण्यात आले. सावित्रीबाई फुले यांचे महान कार्य डोळ्यासमोर ठेवून , ग्रामीण भागातील महिलांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी आम्ही उद्योग उपलब्ध करून दिला आहे.तसेच सावित्रीबाई फुले ब्रिगेड महिला संघाच्या वतिने अनेक विविध उपक्रम राबिवले जातील असे सावित्रीबाई फुले ब्रिगेड महिला संघाच्या संस्थापिका अध्यक्षा पुष्पाताई राणे यांनी पत्रकाराशी बोलतांना सांगितले. यावेळी परिसरातील महिला व सावित्रीबाई फुले ब्रिगेड महिला संघातील महिला  पदाधिकारी तर आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web