टाटा औष्णिक वीजनिर्मिती केंद्राला ऊर्जामंत्री यांची भेट

प्रतिनिधी.

मुंबई – मुंबईत दि. १२ ऑक्टोबर रोजी घडलेल्या वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ऊर्जामंत्री गेली काही दिवस प्रत्यक्ष घटनास्थळांना भेटी देऊन संबंधित यंत्रणेच्या बैठका घेत आहेत. आज त्यांनी ट्रॉम्बे येथील टाटा औष्णिक वीजनिर्मिती केंद्राला भेट देऊन पाहणी केली तसेच बैठक घेऊन विविध सूचना केल्या.

यावेळी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, टाटा पॉवरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक प्रवीर सिन्हा, महापारेषणचे संचालक (संचलन) संजय ताकसांडे, टाटा पॉवरचे प्रेसिडेन्ट (ट्रान्समिशन ॲण्ड डिस्ट्रिब्यूशन) संजय बांगा आदी उपस्थित होते.

यावेळी ऊर्जामंत्र्यांनी टाटा पॉवरच्या आयलँडिंग यंत्रणेच्या नियंत्रण कक्षाला भेट दिली. त्यांना तेथील सुपरव्हायजरी कंट्रोल ॲण्ड डाटा ॲक्विझिशन (स्काडा) बाबत माहिती देण्यात आली. त्यांनी सेंट्रल कंट्रोल रुम फॉर रिन्यूएबल असेट्सलाही भेट दिली. शेवटी प्रत्यक्ष वीजनिर्मिती प्रकल्पाला भेट देऊन वीजनिर्मिती यंत्रणेविषयी माहिती घेतली.

Share via
  •  
  •  
  •  
  •  
  •  

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web