दिवसाढवळ्या लूटमार करणाऱ्या दोघां चोरट्यांना महात्मा फुले चौक पोलिसांनी मोठ्या शिताफीने केले गजाआड

प्रतिनिधी.

कल्याण – कल्याण पश्चिमेतील काळा तलाव परिसरात भर रस्त्यात एका व्यक्तींला बेदम मारहाण करून लुटणाऱ्या दोन आरोपींना  कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. मिळालेल्या वर्णन आणि पोशाख घातल्याची माहिती घेत . एका चोरट्याने निळ्या रंगाचा शर्ट घातला आहे, फक्त एवढीच माहिती पोलिसांकडे होती. या निळ्या रंगाच्या शर्टच्या सहाय्याने पोलिसांनी या दोघा चोरांना शोधून काढले.

       कल्याण पश्चिमेतील काळा तलाव परिसरात एका इमारतीचे काम सुरु आहे. याठिकाणी अफजल अन्सारी हे काम करतात. अफजल अन्सारी हे उल्हासनगरला राहतात. रविवारी (१   नोव्हेबर) संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास अफजल अन्सारी हे इंदिरानगर परिसरात पायी जात होते. यावेळी रस्त्यात दुचाकीवरुन आलेल्या दोन तरुणांनी अन्सारी यांना हटकले. चाकूचा धाक दाखवत त्यांना मारहाण केली.चोरट्यांनी अन्सारी यांचा मोबाईल हिसकावून घेतला. त्याचबरोबर चोरट्यांनी अन्सारी यांच्याजवळील पैसे लुटून धूम ठोकली. अफजल यांनी कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दोन्ही लुटारुंपैकी एकाने निळ्या रंगाचा शर्ट घातला होता, अशी माहिती अफजल यांनी पोलिसांना दिली.
महात्मा पुणे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण बनकर, पीआय संभाजी जाधव यांनी एक पोलीस पथक तयार करुन तपासाला सुरुवात केली. चोरट्याने निळा रंगाचा शर्ट घातला आहे, या आधाराने पोलिसांनी संपूर्ण इंदिरा नगर  पिंजूळ काढले .

अखेर नागरिकांच्या मदतीने निळ्या रंगाच्या शर्ट घातलेल्या तरुणाला पोलीस कर्मचारी जेके शिंदे आणि विजय भालेराव यांनी शोधून काढले. पोलिसांनी प्रवीण चव्हाण नावाच्या तरुणाला ताब्यात घेऊन विचारपूस केली असताना त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी प्रवीण चव्हाण आणि विकास टेमघरे या आरोपींना अटक केली.दरम्यान कोरोना काळात आर्थिक समीकरणे बिघडल्याने आता गुन्हेगारी घटनेत विलक्षण वाढ होताना दिसत आहे मात्र पोलीस प्रशासन ला साथ देत , नागरिकांनी ही  सतर्कता दाखवण्याची आवश्यतेची गरज निर्माण होतांना दिसत आहे .

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web