प्रतिनिधी.
कल्याण – आठ वर्षांपूर्वी चोरीला गेलेले दागिने कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी संबंधित कुटुंबाला परत मिळवून दिले आहेत. त्यामुळे कोरोना काळात आर्थिक विवंचनेत असलेल्या त्या कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे. घाग कुटुंबाने कल्याण पोलिसांचे आभार मानले आहेत.
दिवा येथे राहणारा संदीप घाग हा तरुण २०१२ मध्ये कामानिमित्ताने कल्याणला आला होता. तो रेल्वे ट्रॅकवरुन चालत जात असताना काही चोरट्याने त्याला हटकले. त्याच्या जवळील असलेल्या दागिने घेऊन चोरटे पसार झाले. यानंतर काही वर्षांनी पोलिसांनी संदीपला लुटणाऱ्या चोरट्यांना अटक केली त्यानंतर घाग कुटूंबियांना त्यांचे पोलिसांनी चोरीला गेलेले ऐवज परत केल्याने त्याचा आनंद गगनात मावनासे झाल्यासारखे झाले आहे . लोहमार्ग पोलिसांचे सर्वच स्थरातून कौतुक केले जात आहे