कल्याण डोंबिवली महापालिकेचा एम.एम. आर.परिक्षेत्रात डिसचार्ज रेट सर्वात जास्त

प्रतिनिधी.

कल्याण – कोरोनाच्या सुरवातीच्या काळात कल्याण डोंबिवली मध्ये कोरोनाने थैमान घातले होते. पण आता कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९४.४६ टक्के इतके झाले आहे. कल्याण डोंबिवली करांसाठी हि बाब खूप सकारात्मक आहे. तरी नागरिकांनी अजून योग्य प्रकारे काळजी घेतली व नियमाचे पालन केले तर लवकरच आपण पूर्ण पणे कोरोना हि लढाई जिंकू शकतो.

कोरोना साथीला आळा घालण्याच्या दृष्टीने महापालिका करीत असलेल्या अनेकविध प्रतिबंधात्मक उपायांमुळे , कल्याण डोंबिवली महापालिकेतील कोरोना रुग्णांचा डिसचार्ज रेट सातत्याने चांगला राहिला असून महापालिकेतील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर २ टक्क्यांपेक्षा कमी आहे. महापालिकेतील कोरोनामुक्त होणा-या रुग्णांचे प्रमाण ९४.३० टक्के इतके होते, तरआता कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९४.४६ टक्के इतके आहे.महापालिकेने आतापर्यंत सुमारे १,९५,000 इतक्या चाचण्या (स्वॅब आणि ॲन्टीजेन ) केल्या असून महापालिकेचा पॉझिटिव्हीटी रेट ६ टक्क्यापर्यन्त आहे. महापालिकेतील दैनंदिन ॲक्टीव केसेसचे प्रमाणही (उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या) २ हजार पेक्षा कमी असून महापालिकेच्या कालचा डबलिंग रेट २०९ दिवस इतका आहे

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web