१७ व्या मजल्यावरून पडून तरुण मृत्युमुखी, मृत्यूचे गूढ कायम

प्रतिनिधी.

कल्याण – कल्याणच्या खडकपाडा परिसरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खडकपाड्यात हाई प्रोफाइल सीजन स्प्रिंग कॉम्प्लेक्समध्ये राहणारा प्रथमेश गोळे हा १६वर्षीय मुलगा अचानक १७ व्या मजल्यावरून पडून मृत्युमुखी पडला, ही घटना संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास घडली . नक्की कोणत्या कारणाने ही घटना घडली याचा तपास सुरू असल्याचे समोर येत आहे . प्रथमेश याचे वडील हे अमेरिकेत एका कंपनीत कामाला होते. प्रथमेश याचं दहावीपर्यंतचं शिक्षण अमेरिकेत झालं आहे. लॉकडाऊनमुळे गोळे कुटुंब कल्याणमध्ये राहायला आलं. प्रथमेशने कल्याणच्या एका कॉलेजमध्ये अकरावीसाठी प्रवेश घेतला होता, अशी माहिती खडकपाडा पोलीस स्टेशनचे सिनियर पीआय अशोक पवार यांनी दिली. दुर्घटना घडली तेव्हा घरात इतर कुटुंबीयदेखील हजर होते.दरम्यान, प्रथमेशने आत्महत्या केली की अपघातामुळे त्याचा मृत्यू झाला, याचा तपास सुरु आहे. मात्र कल्याणच्या एका हाय प्रोफाइल कॉम्प्लेक्समध्ये घडलेल्या प्रकारामुळे  एकच खळबळ उडाली आहे. 

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web