प्रतिनिधी.
कल्याण – कल्याण पश्चिमेतील वालधूनी परिसरात एका तरुणाचा मोबाईल हिसकावून चोरट्यांनी पळ काढल्याची घटना सीसीटीइव्हीत कैद झाली होती. या सीसीटीव्हीच्या सहाय्याने कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी तपास सुरु केला. एसीपी अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरिक्षक नारायण बनकर यांनी पोलीस पथक तयार केले. आणि मोठ्या शिताफीने मोबाईल चोराला गजाआड केले आहे पाच प्रियाशीची हौसमौज करण्यासाठी मोबाईल चोर बनला होता मात्र त्याचे कृत्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्याने त्याच्या मुसक्या आवळल्यात पोलिसांना मदत झाली
या घटनेचा तपास पोलीस अधिकारी प्रकाश पाटील यांच्याकडे दिला गेला. अखेर पोलिसांना तपासात यश आले. भिवंडी येथील नांदेडकरमध्ये राहणारा मोबाईल चोरटा निखील ठाकरे याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून पोलिसांनी दहा मोबाईल हस्तगत केले. कल्याणमधील तीन घटना उघडकीस आल्या आहेत. अन्य मोबाईल याने कुठून चोरले आहे. याचा तपास सुरु आहे. तसेच, त्याच्या एका साथीदाराचा शोध सुरु आहे.
दरम्यान चोराचा चोरी करण्याचा उद्देश्य ऐकून पोलीस थक्क झाले , निखील याला पाच गर्लफ्रेंड आहेत. तो प्रत्येक गर्लफ्रेंडची हौस भागवतो. त्याच्याकडे खूप पैसा आहे. हे दाखविण्यासाठी निखीलने मोबाईल चोरीचा धंदा सुरु केला होता. पोलिसांनी त्याचा मुसक्या आवळल्या आहेत. या सबोतच महात्मा फुले पोलिसांनी दुसऱ्या प्रकरणातील दोन मोबाईल चोरटे अविनाश विठ्ठल आणि एका अल्पवयीन मुलाला अटक करुन त्याच्यांकडूनही मोबाईल हस्तगत केले आहेत.