वंचित चे चिपको आंदोलन यशस्वी

प्रतिनिधी.

अकोला – अकोला ते बार्शीटाकळी ह्या रस्त्याच्या कडेला असलेली जवळपास १८०० जुने वृक्ष कत्तलीस सुरुवात झाली होती.रस्ता रुंदीकरण करण्याच्या नावावर ही मोठी वृक्षतोड होत असून त्या विरोधात आज दि. २२ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी ११ वाजता पक्षाच्या वतीने प्रदेश पदाधिकारी राजेंद्र भाऊ पातोडे ह्यांचे प्रमुख उपस्थिती प्रमोद देंडवेजिल्हाध्यक्ष,वंचित बहुजन आघाडी,प्रभाताई शिरसाट,जिल्हाध्यक्षवंचित बहूजन आघाडी,राजकुमार दामोदर जिल्हाध्यक्षसम्यक विध्यार्थी आंदोलन,सचिन शिराळे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख ह्यांचे नेतृत्वाखाली वृक्ष बचाओ ” चिपको आंदोलन ” करण्यात आले.संबंधित अधिकारी, तहसिलदार ह्यांनी नविन वृक्ष लागवडी शिवाय वृक्ष तोड करणार नसल्याचे स्पष्ट केल्याने वंचितने आंदोलन मागे घेतले.ह्या वेळी जिल्हा, तालुका, सर्कल, ग्रामशाखा, महिला आघाडी, सम्यक, युवक पदाधिकारी कार्यकर्ते ह्यांनी सकाळी ११ वाजता कान्हेरी सरप येथे मोठया संख्येने हजर होऊन झाडांना आलिंगन देत आंदोलन सुरू केले होते.दोन तासांनी शाखा अभियंता तहसीलदार गजानन हामंद, ठाणेदार तिरुपती राणे ह्यांनी आंदोलकांची भेट घेतली.तसेच वंचितने मागणी केल्या प्रमाणे नवीन वृक्ष लागवड करूनच जुनी झाडे काढण्यात येतील असे शाखा अभियंता ह्यांनी स्पष्टपणे सांगून वृक्षतोड करणार नसल्याचे मान्य केले.त्यामुळे वंचित चे चिपको आंदोलन मागे घेण्यात आले.दिलेल्या आश्वासना प्रमाणे वागले नाही तर बांधकाम विभागाला घेराव घालू असा इशारा ह्या वेळी पदाधिकारी ह्यांनी दिला.ह्यावेळी वंचित चे पदाधिकारी शोभाताई शेळके,प्रतिभाताई अवचार,भारत निकोशे,नईमोद्दिन अलमोद्दीन,तमीज खा (गोबासेठ),प्रतुल विरघट,आकाश गवई,सुरेश जामनिक, संतोष सुरडकर, गोपाल बाभुळकर, जनार्दन खिल्लारे, विपीन गवई,आशिष ढोरे,प्रशांत भातखडे,शुध्दोदन इंगळे,ऋषीकेश खंडारे, अजाबराव जाधव,राजेश खंडारे,गजानन दांडगे, अमोल जामनिक,आकाश खरात, रोशन चौटाला, अॅड सुनिल शिरसाट,संतोष पंडित, नवनित वानखडे,नितीन सपकाळ,विकास सदांशिव,अमोल सरप, शंकर इंगोले, मनोहर बनसोड,गजानन दांडगे, दादाराव पवार,धिरज इंगळे, विशाल नंदागवळी,राजदिप वानखडे,उमेश गवई,आनंद आभझरे, संतोष गवई,सिध्दार्थ डोंगरे, डॉ सुनिल शिराळे,रामदास गवई,दादाराव सुरडकर, निकि डोंगरे,अजय अरखराव,संतोष वनवे,इमरान शेख,मनिष रूल्हे,शंकरराव हागे, चंदु मोहोड, निलेश मोहोड, रितेश मोहोड, प्रतिक मोहोड, अनिकेत हिवराळे, आदित्य मोहोड,मोहन दाते, प्रशांत भातखडे,रक्षक जाधव, अमर सराटे,दादाराव पवार, धीरज धुरंधर,आदि प्रामुख्याने उपस्थित होते, असे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख सचिन शिराळे ह्यांनी कळविले आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web