प्रतिनिधी.
कल्याण – नामांकित कंपन्यांचे बनावट तूप बनवत असल्याची गुप्त माहिती क्राईम युनिट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांना मिळाली असता.त्यांनी डोंबिवली पूर्व याठिकाणी सापळा रचून अभिषेक या आरोपीला अटक केली.
त्यांच्या कडुन मिळालेल्या माहिती च्या आधारे पोलिसांनी अजून पाच आरोपींना अटक केली हे सर्व आरोपी मिरारोड, भाईंदर, कांदिवली,दहिसर याठिकाणी राहत होते यांच्यातील मुख्य आरोपी चन्द्रेश याला अटक केली .
दहिसर याठिकाणी त्याचे असलेले गोडाऊन वर छापा मारून बनावट तुपाचा साठा जप्त केला.
तसेच तूप बनवण्यासाठी सोया तेल व लॉयन डालडा याचा वापर करत असत.व नामांकित कंपनी असलेल्या अमूल गोवर्धन कृष्णा यांच्या बनावट पॅकेट मध्ये टाकून पॅक कराचे व तुपाचा सुगंध येण्यासाठी आर्टिफिशल फ्लवैर वापरात असत.
जवळपास पाच महिन्या पासून हे बनावट तूप बनवत असल्याचे माहिती पोलिसांना मिळाली. त्यांच्याकडून तब्बल १ टन कच्चामाल जवळपास त्यामध्ये २१० लिटर डालडा ,७३५ लिटर तेल व १० लिटर बनावट तूप जप्त करण्यात आलंय.सणासुदीच्या दिवसामध्ये तुपाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. आणि असे हे समाजकंटक सामान्य लोकाच्या जीवाशी खेळ करत असतात. त्यामुळे या कामगिरी मुळे पोलिसाचे सर्व बाजूने कौतुक होत आहे.