कल्याणात ड्रॅग माफियांचा सामाजिक कार्यकत्यावर प्राणघातक हल्ला, आरोपी गजाआड

प्रतिनिधी.

कल्याण – ड्रग्ज माफियांविरोधात वारंवार तक्रार करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते हल्ला केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. मयत समजून ड्रग्ज माफिया पळून गेले. मात्र, सीसीटीव्हीत एक हल्लेखोर कैद झाल्याने या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला आहे. आठ आरोपींपैकी चार आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अन्य चार आरोपींचा पोलीस शोध घेत आहे .

कल्याण डोंबिवलीत असे अनेक परिसर आहे. ज्या ठिकाणी लपूनछपून ड्रग्जचा धंदा केला जातो. तरुण तरुणी ड्रग्जच्या आहारी गेले आहेत. ड्रग्ज माफिया कॉलेज शाळेतील तरुणाई लक्ष्य केले आहे. कल्याण पश्चिमेतील बैलबाजार परिसरात काही वर्षापासून ड्रग्जचा धंदा सुरु असल्याने अनेक वेळा लोक पकडले गेले आहे. कल्याण पोलीस वारंवार कारवाई करत आहेत. मात्र, हा धंदा जास्त  फोफावला आहे.बैल बाजार परिसरात राहणारे आमीर खान यांनी ड्रग्ज माफियांच्या विरोधात आवाज उठवत त्यांची पोलिसांकडे लेखी तक्रार केली होती. चार वर्षांपूर्वी बैलबाजार परिसरातील कुख्यात ड्रग्ज माफिया रहमत पठाण विरोधात सुद्धा तक्रार अमीर खान यांनी केली होती. वारंवार आमीर खानकडून केल्या जाणाऱ्या तक्रारीमुळे ड्रग्ज माफियांचा धंदा गोत्यात आला होता. हे सर्व सुरु असताना आमीर रात्रीच्या वेळी घरी परतत असताना घराचा जिना चढत असताना काही अज्ञात लोक त्यांच्या जवळ आले. त्यांच्या तोंडावर कपडा टाकून त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. या प्राणघातक हल्यात ते बेशूद्ध झाले. त्यांना मयत समजून हल्लेखोर पसार झाले.

मात्र, परिसरात एका ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीत एक आरोपी कैद झाला. या आरोपीची ओळख पटल्याने पोलिसांना सर्व बाब लक्षात आली. कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक नारायण बनकर यांनी पोलीस अधिकारी गणेश कुंभार, दीपक सरोदय पोलीस कर्मचारी विजय भालेराव आणि दीपक सानप यांच्या एक पोलीस पथक तयार करुन तपास सुरु केला. याप्रकरणी आतापर्यंत आरोपी बबन वाणी, इर्शाद शेख, भूषण मोरे आणि संजय सिंग यांना अटक करण्यात आली आहे. अन्य ४ आरोपी रहमत पठाण, छोटे, इश्वर आणि सोनू सिंग यांचा पोलिस शोध घेत आहेत. या या प्रकरणातील इतर आरोपी लवकरात लवकर अटक होणार अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र, या हल्ल्यामुळे पोलिस यंत्रणा खळबळून जागी झाली आहे.दरम्यान सामाजिक कार्यकर्ते यांच्या वर हल्ले सुरू झाल्याने माफियांची हिम्मत वाढत चालली आह. हि बाब धोकादायक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे माफियांवर जरब बसण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर पाऊले उचलण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web