पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांची मुजोरी ग्राहक तरुणांना बेदम मारहाण

प्रतिनिधी.

कल्याण – गाडीत पेट्रोल टाकले तर पाणी कसे काय निघते. फक्त इतकेच विचारल्याने दोन तरुणांना पेट्रोल पंपावरील कर्मचा:यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. पेट्रोल पंपावरील कर्मचा:यांच्या गुंडगिरीने डोंबिवलीत एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करीत चार जणांना अटक करुन पुढील तपास पोलिस करीत आहेत. 
              कल्या़ण पूव्रेत राहणारा मोहम्मद सय्यद सहीम आणि त्याचा मित्र शुभम सिंग काही कामानिमित्त डोंबिवलीला गेले होते. येताना त्यांच्या गाडीतील दुचाकीमधील पेट्रोल कमी असल्याने त्यांनी गाडी डोंबिवलीतील ‘उस्मा पेट्रोल” पंपावर घेतली.गाडीत पेट्रोल टाकले गेले. काही अंतरावर गेल्यानंतर गाडीमध्ये बिघाड झाला. मोहम्मद सहीम हा गॅरेजमध्ये काम करतो. त्यामुळे त्याच्या लक्षात आले की, गाडीत काही बिघाड झाला आहे. त्याने गाडीतील पेट्रोल चेक केले. त्याठिकाणी गाडीतून पेट्रोल ऐवजी पाणी बाहेर आले. त्वरीत त्यांनी पुन्हा पेट्रोल पंपावर जाऊन विचारणा केली की, गाडीत पेट्रोल भरले होते. तर त्यातून पाणी कसे येत आहे. पेट्रोल कुठे गेले. अशी विचारणा केली. या गोष्टीचा राग पंपावरील कर्मचारी विरेंद्र सिंग, विक्रांत सिंग आणि गोविंद कुमार आणि अभय काटवटे या चार जणांनी मोहम्मद सहीव व शुभम सिंगला बेदम मारहाण केली. या मारहामीत दोघांचे हात पाय फॅक्चर झाले आहेत. त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. मानपाडय़ाचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक दादा हरी चौरे यांनी सांगितले की, 
दरम्यान मानपाडा पोलिसांनी या प्रकरणातील चारही जणांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरु आहे.  

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web