कल्याण – मुंबई आर्थिक गुन्हे शाखेत तपास सुरु असताना एका मोठ्या कंपनीच्या सीएचा मृतदेह संशयास्पद आढळून आला आहे .टिटवाळाजवळ रेल्वे रुळाजवळ मिळून आल्याने एकच खळबळ उडाली. सागर देशपांडे असे या सीएचे नाव असून ते ११ ऑक्टोबरपासून बेपत्ता होता. सागर यांनी आत्महत्या केली आहे, की त्यांच्यासोबत घातपात झाला आहे. याचा तपास रेल्वे पोलीस करीत आहेत.
कल्याणजवळच्या टिटवाळ्यात १२ ऑक्टोबर रोजी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह रेल्वे रुळाच्या बाजूला आढळून आला होता. कल्याण रेल्वे पोलिसांनी एडीआर दाखल करत पुढील तपास सुरु केला. सदर मृतदेहाची ओळख पटण्यासाठी त्याचे फोटो राज्यभरात पाठविण्यात आले. अखेर आज त्या व्यक्तीची ओळख पटली. हा व्यक्ती ११ ऑक्टोबरपासून बेपत्ता होता. ठाण्यातील नवापाडा पोलीस ठाण्यात या व्यक्तीची मिसिंगची रिपोर्ट दाखल आहे. नातेवाईक सहा दिवसापासून त्याचा शोध घेत होते. सागर सुहास देशपांडे असे या व्यक्तीचे नाव आहे. सागर हे एका मोठ्या कंपनीत सीए होते. आणि ठाणे नौपाडा मधील चरई मधील राहणार असल्याचे समोर आले आहे ते ट्रॅव्हल्स फर्म कंपनी कामाला होते त्यांच्या कंपनी चा करोडो रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी सुरू असल्याचे माहिती समोर येत आहे नक्की त्यांची हत्या झाली की आत्महत्या च्या तपास पोलिसांनी सुरू केला आहे .