२७ गावातील समस्या सोडवण्यासाठी ग्रामस्थांनी घेतली केडीएमसी आयुक्तांची भेट

प्रतिनिधी.

कल्याण – २७ गावांची विभागणी झाल्यापासून कल्याण डोंबिवली महापालिकेने सुविधा पुरवण्याचे कमी केले आहे.त्यामुळे रस्त्यांवर मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत.सततच्या अपघातांना वाहनचालक देखील कंटाळले आहेत.तर गावांमध्ये कमी दाबाने होत असलेला पाणीपुरवठा यांमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच जागोजागी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे माजी नगरसेवक कुणाल पाटील आणि ग्रामस्थ यांनी आयुक्तांची भेट घेत समस्यांचा पाढा आयुक्तां समोर मांडला.आयुक्तांनी देखील पाटील व ग्रामस्थाच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने लक्ष घालून समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहे.यावेळी २७ गाव संघर्ष समितीचे उपाध्यक्ष विजय भाने, मा.सरपंच बळीराम भाने, वासुदेव गायकर, दिलीप दाखिनकर, प्रदीप गुप्ता आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web