महाराष्ट्र सरकार प्रतिगामी व्हायला लागले आहे – ॲड. प्रकाश आंबेडकर

प्रतिनिधी.

पाटणा – पुरोगामी असलेले महाराष्ट्र सरकार हे आता प्रतिगामी व्हायला लागले आहे. कोरोनाच्या काळात लॉकडाऊन उठविताना केंद्राने काही गाईड लाईन दिल्या होत्या, त्यादेखील मान्य करायला महाराष्ट्र सरकार तयार नाही. त्यामुळे राज्याची आर्थिक स्थिती इतर राज्यांच्या तुलनेत बिकट होत चालली असून महाराष्ट्र सरकारने बेभरवशावर न राहता निर्णय घेणारे राज्य म्हणून पुन्हा लौकिक मिळवावा, अशी विनंती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली.

ॲड. प्रकाश आंबेडकर हे सध्या निवडणुकीच्या निमित्ताने बिहार मध्ये असून त्यांनी अनेक राज्यांचा दौरा केल्यावर त्यांच्या असे लक्षात आले की लॉक डाउन नंतर इतर राज्यांची आर्थिक परिस्थिती महाराष्ट्रापेक्षा ही चांगली आहे. इतर राज्यांनी लॉक डाऊन उठविताना केंद्राच्या गाईडलाईनचा आधार घेतला होता. मात्र महाराष्ट्र सरकार केंद्राची गाईड लाईन मान्य करायला तयार नाही. शिवाय महाराष्ट्र सरकारने अद्यापही लॉकडाउन उठविला नाही. राज्यातील मंदिर बंद असल्याने स्थानिक लोकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे बेभरवशावर न राहता पुरोगामित्व निर्णय घेणारे राज्य उभे करावे, अशी विनंती ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे, अशी माहिती
वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web