कल्याण मध्ये नवरंग पक्षी उष्माघाताचा फटका बसून जखमी

प्रतिनिधी.

कल्याण – कल्याण मधील खडकपाडा येथे नवरंग पक्षी हा पक्षी प्रेमी महेश बनकर यांना जखमी अवस्थेत आढळून आला.उष्माघाता मुळे हा पक्षी जखमी झालेला होता. नवरंग पक्षी ( Indian Pitta ) नऊ रंगांची छटा असलेला आणि सुरेल शीळ वाजविणारा नवरंग पक्षी दक्षिणेकडून विणीसाठी येत असतो. मे ते ऑगस्ट हा या पक्ष्यांचा विणीचा हंगाम असतो. त्यामुळे दक्षिण भारतातून ते गौताळामध्ये येत असतात. ऑगस्टनंतर ते पुन्हा दक्षिण भारतात जातात. झुडपी, जंगले, पानझडी जंगले ही ठिकाणे आवडती असल्याने मुख्यत: या ठिकाणी जमिनीवर उडय़ा मारत फिरताना आढळतो. म्हणून त्यास भुचरपक्षीसुद्धा म्हणतात.
नवरंग पक्षातील नर आणि मादी दिसायला सारखेच असतात. पाठीवर हिरवा, निळा, पोटावर व डोक्यावर पिवळा, डोळय़ापाशी काळा, चोच लालसर, डोक्याचा खालचा भाग पांढराशुभ्र, पिसे हिरवी, निळी, लाल, नारंगी रंगाची अशा प्रकारे विविध रंग या पक्ष्याला असतात. हा पक्षी आकारमानाने मैनेएवढा असून भुंड्या शेपटीचा आहे. त्याचा पोटाखालचा व शेपटीखालचा रंग किरमिजी असतो. नवरंग पक्षी उडताना पंखांच्या टोकावर ठळक पांढरे ठिपके दिसतात.नवरंगाच्या विणीचा काळ मे ते ऑगस्ट असून गवत, झाडांचे मूळ, काड्या यापासून बनविलेल्या घरट्यात पक्ष्याची मादी चार ते सहा अंडी देते. विविध प्रकारचे कीटक हे नवरंगाचे खाद्य आहे. झुडपी जंगलात राहणे अधिक पसंत करणारा हा पक्षी आपला बहुतेक वेळ जमिनीवर घालवतो. त्याचा व्हीट – ट्यू असा आवाज सकाळ संध्याकाळ ऐकू येतो. हा ढगाळ हवेत दिवसभर आवाज करतो.

पाठीवर हिरवा, निळा, पोटावर व डोक्यावर पिवळा, डोळय़ापाशी काळा, चोच लालसर, डोक्याचा खालचा भाग पांढराशुभ्र, पिसे हिरवी, निळी, लाल, नारंगी रंगाची अशा प्रकारे विविध रंग असलेला नवरंग पक्षी उष्माघाताचा फटका बसून जखमी झाला असून पक्षी प्रेमी महेश बनकर यांनी त्या पक्षावर उपचार सुरु केला आहे

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web