कल्याण-डोंबिवली शहराच्या वाटोळ्याला भाजपाही जबाबदार-मनसे आ. राजू पाटील

प्रतिनिधी.

कल्याण – डोंबिवली एमआयडीसी व लगतच्या ९ गावांमध्ये सुधारित मालमत्ता कर आकारण्याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी आज केडीएमसी आयुक्तांची भेट घेतली. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत त्यांनी भाजप आणि शिवसेनेवर टीका केली. 

केडीएमसीत भाजपच्या कालच्या ठिय्या आंदोलनावर मनसे आमदार राजू पाटील यांनी टीका केली आहे. शिवसेना-भाजपमध्ये सहा महिन्यांपूर्वी राजकीय घटस्फोट झाला आहे. भाजप दायित्वापासून दूर जाऊ शकत नाही. 25 वर्षांपासून भाजप त्यांच्यासोबत सत्तेत होती. त्यामुळे दोन्ही शहरांचे वाटोळे लावण्यात भाजपचाही तितकाच सहभाग आहे, अशी टीका मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.तर कल्याण डोंबिवलीतील रखडलेल्या प्रकल्पासंदर्भात बोलताना “पत्री पुलाचे ज्या प्रकारे काम सुरु आहे, तो जगातील आठवा अजूबा होणार असे वाटतंय”, अशी टीका त्यांनी केली. कारण, या पुलावर आज त्यांना महापालिकेत येताना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. नागरीकांना किती त्रास सहन करावा लागतो. याकडेही आमदारांनी लक्ष वेधले.दरम्यान मनसे आमदार राजू पाटील यांनी 27 गावातील मालमताना चुकीच्या दराने केलेल्या कर आकारणीकडे पालिका आयुक्तांचे लक्ष वेधले. पालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या 27 गावपैकी 18 गावे वगळली गेली असली तरी आद्यपी पालिकेत असलेल्या 9 गावांना महापालिका प्रशासनाने योग्य दरानुसार कर आकारणी करण्याऐवजी 2015 च्या बाजार भावानुसार कर आकारणी केली आहे. यामुळे नागरिकांना 3 पट, 5 पट आणि काही जणांना 8 पट कर वाढ लादली गेली असून ही आकारणी चुकीची असल्याचे पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आमदार पाटील यांनी आणून दिले.तसेच हा प्रश्न सोडविल्यास पालिकेचा रखडलेला मालमत्ता कर वसूल होऊ शकेलं असे ते म्हणाले.तसेच आमदार राजू पाटील यांनी आयुक्तांना पत्र सुद्धा दिले आहे.गेल्या तीन वर्षांपासून सदर प्रश्न प्रलंबित असल्याने हा मालमत्ता कर प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यासाठी आयुक्तांनी सांगितले.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web