शहर स्वच्छतेत कचरावेचक महिलांचे मोलाचे योगदान

प्रतिनिधी.

डोंबिवली – शहरात स्वच्छतेत खारीचा वाटा उचणाऱ्या कचरावेचक महिलांचे मोलाचे योगदान असते. कचऱ्यावर उपजीविका असणाऱ्या या महिलांना दिवसभर वणवण करून वेचलेला कचरा विकून ४०० रुपये मिळतात. कचराकुंडीतील कचरा वेचून शहरातील कचरा व्यवस्थापनेचा हा भाग समजला जातो. मात्र पालिका प्रशासन या महिलांकडे लक्ष देत नसल्याने या महिलांसाठी संघटनेची आवश्यकता आहे. डोंबिवलीत सुमारे ४०० ते ५०० कचरा वेचक महिला दिवसभरात सुमारे १ टन कचरा उचलतात.

 डोंबिवलीतील सिद्धार्थनगर, आण्णानगर,ज्योतीनगर,राहुलनगर,क्रांतीनगर,ज्योतिनगर, राजूनगर येथील सुमारे ४०० ते ५०० कचरावेचक महिला सकाळी ५ वाजल्यापासून ते दुपारी १ वाजेपर्यत रस्त्यावरील, कचराकुंडीतील, डंपिंग ग्राउंडवरील कचरा वेचण्याचे काम करतात जमा झालेल्या कचऱ्यातून भंगारात विकले जाणारे कागद, बाटल्या, लाकूड, लोखंड इत्यादी सामान बाजूला करतात. यातून त्यांना दिवसभरात ४०० रुपये मिळतात. शहरातील कचरा व्यवस्थापनत खारीचा वाटा उचलणाऱ्या या महिलांकडे पालिकेने मात्र लक्ष दिले नाही असे माणिक उघडे यांनी सांगितले. याबाबत अधिक माहिती देताना उघडे म्हणाले, १९९२-९५ साली प्रमोद मुजुमदार, विनयानंद हडकर आणि मी नवनिर्माण कचरा वेचक संघटना स्थापन केली होती. कचरा वेचताना कचरा वेचक महिलांचा फोटो, सर्वे करण्यात आला होता.परंतु काही कारणाने संघटनेचे काम थांबले.

  विलगीकरण केलेला कचरा कांजूरमार्ग येथील कारखान्यात दिला जातो. येथेही जास्त भाव मिळत असल्याने या महिलांना फायदा होत असतो. दिवसभर कचरा वेचणे, त्यानंतर कचऱ्याचे विलीगीकरण करणे, तो कचरा विकणे हे काम करावे लागते. नागरी कचऱ्याचे विलीगीकरण न करता तसाच टाकला असल्याने कचरावेचकांच्या हातापायांना जखमा होत असतात. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात डोंबिवलीत कचरावेचक महिलांची सभा घेतली होती. कचरा वेचक महिलांनी जमा केलेला कचरा संस्थ्कडे दिल्यानंतर एका किलोमागे ठरविक रक्कम दिली जाते. संस्था तो कचरा पालिकेच्या सुरु असलेल्या प्रकल्पाच्या ठिकाणी नेऊन देतात. याचा फायदा घनकचरा व्यवस्थापनाला होत असला तरी काही दिवसांनी हे काम थांबले. वास्तविक कचरा वेचक महिलांच्या कामातून शहर स्वच्छ होत असून आजवर पालिका प्रशासन याच्याकडे लक्ष देत नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे .शून्य कचरा मोहिमेत कचरा वेचक महिलांचे मोठे योगदान असून त्यांना साधे कौतुक प्रशासनाकडून होत नाही.तर कचरा वेचताना या महिलांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होत असतात, त्याच्या कडेही कुणाचे लक्ष नाही.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web