प्रतिनिधी.
कल्याण – कल्याण परिसरात धूम स्टाईल ने मोबाईल चोरी करण्याचे प्रकार वाढले होते. असाच एक प्रकार कल्याण खडकपाडा पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडला होता. या प्रकरणी खडकपाडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करत तपासासाठी पथके नेमत या चोरट्याचा शोध सुरू केला. अखेर सराईत चोरट्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले. धनंजय पाटील असे या आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याच्याजवळून 12 मोबाईल व एक महागडी मोटरसायकल हस्तगत केली आहे. धनंजय पाटील हा सराईत चोरटा असून तो रस्त्यावर बेसावध असणाऱ्या नागरिकांचे मोबाईल खेचून पसार होत असे. त्याच्याकडून आठ गुन्हे उघडकीस आले असून त्याच्या विरोधात कल्याण डोंबिवलीतील खडकपाडा, कोलशेवाडी, रामनगर, विष्णू नगर येथे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.