संविधान व आरक्षण वाचवायचे असेल तर एनडीएला मतदान करू नका – प्रकाश आंबेडकर

प्रतिनिधी.

पाटणा – केंद्रातील सरकार हे संविधान तसेच आरक्षण विरोधी असून त्यांनी वैदिक धर्माच्या प्रसाराला सुरुवात केली आहे. देशात तानाशाही आणण्याच्या प्रयत्नात ते असून अशा एनडीए सरकारला बिहारमध्ये पुन्हा सत्तेवर येऊ द्यायचे नाही. त्यासाठी सर्व आंबेडकर व आरक्षणवाद्यांनी एनडीएला मतदान करू नये, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

बिहारमध्ये निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून राजकीय वातावरण तापू लागले आहे. केंद्रात तसेच बिहार मध्ये एनडीएचे सरकार असून हे लोक आरक्षण तसेच संविधान संपवण्याच्या मार्गावर आहे. विद्यार्थी वर्गापासून वैदिक धर्माचा प्रसार सुरू करीत आहे. पार्लमेंटरी डेमोक्रसी असून त्या ठिकाणी तानाशाही आणण्याचा प्रयत्न करीत आहे. असे परखड मत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मांडले. ते पाटणा येथे बोलत होते. अशा प्रकारच्या तानाशाही ला आपल्या पूर्वजांनी विरोध केला होता. तेव्हा महामानव डॉक्टर बाबासाहेबांना लोकांनी साथ दिली होती. एक लढाई जिंकल्यावर नवीन व्यवस्थेला सुरुवात झाली. त्यामुळे आपली इच्छा आहे का जुनी व्यवस्था पुन्हा आली पाहिजे, आपली मुले गुलाम झाली पाहिजे, असे तुम्हाला वाटत नसेल तर आपले मन घट्ट करा. निर्णय घ्या. विशेषता आंबेडकरवाद्यांनी मग तो चांभार असो वा वाल्मिकी असो, पासवान असो वा अन्य कोणी ही, मनाचा पक्का निर्णय घ्या व एनडीएला आपण मत देणार नाही हे निश्चित करा.

निवडणुकीनंतर सरकार कोणाचे येणार हे आता सांगता येणार नसले तरी तुमच्या मत परिवर्तनामुळे जे सत्तेवर येतील ते संविधानानुसार चालतील, अशी अपेक्षा असून सर्व आरक्षित वर्गाला सांगतो की संविधान तसेच आरक्षण वाचले पाहिजे म्हणून एनडीएला मतदान करू नका, असे आवाहन ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web