हाथरस अत्याचार प्रकरणी डोंबिवलीत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

प्रतिनिधी.

डोंबिवली – हाथरस उत्तरप्रदेश येथील पीडित भगिनीं मनीषा वाल्मिकीला न्याय मिळावा या प्रमुख मागणीसाठी आज दि. 3-10-2020 रोजी वंचित बहुजन आघाडी डोंबिवली शहर कमिटी वतीने तीव्र निदर्शने करण्यात आले.यावेळी खालील मागण्या करण्यात आल्या.1) मनीषा वाल्मिकी या भगिनींच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या आरोपीना फाशी द्या. 2) आरोपीना पाठीशी घालणाऱ्या योगी सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा. 3) सदर खटला उत्तर प्रदेश बाहेर मुंबई, दिल्ली किंवा बिगर भाजप शासित राज्यात चालवा. 4) या खटल्यातिल फिर्यादी पीडिताचे कुटुंब व साक्षीदारांना संरक्षण देण्यात यावे. 5) फिर्याद नोंदविण्यात टाळाटाळ करणा-या पुरावे नष्ट करणार्या पोलीस अधिकारी यांना या हत्यांकाडात सह आरोपी करा.यावेळी सुरेंद्र ठोके (मा. डोंबिवली शहर अध्यक्ष), मिलिंद साळवे (क. डों. शहर जिल्हा संघटक ), राजू काकडे (मा. उपाध्यक्ष डोंबिवली शहर ), सम्यक् विद्यार्थी आंदोलन कल्याण डोंबिवली महासचिव राजू खरात, सुरेश छापरवाल, बाजिराव माने,शिवा कांबळे,आशा ठोके,निशा छापरवाल,दिपक भालेराव आदी उपस्थित होते.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web