५०० रुपयांच्या वादातून वाईन शॉप चालकाला कात्रीने भोसकलं,घटना सीसीटीव्हीत कैद

प्रतिनिधी.

उल्हासनगर – पाचशे रुपयांच्या वादातून वाईन शॉप चालकाला कात्रीने भोसकल्याची घटना उल्हासनगर जवळच्या म्हारळ गावात घडलीये. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झालीये.

म्हारळ गावाच्या हद्दीत मुरबाड रोडवर रोझ वाईन शॉप असून या वाईन शॉपमध्ये सोमवारी रात्री आठ ते साडे आठच्या दरम्यान एक अज्ञात इसम दारू विकत घेण्यासाठी आला. यावेळी त्याने आपण पाचशे रुपये दिल्याचा दावा केला, तर दुकानदाराने मात्र पैसे घेतले नसल्याचा दावा केला. यावरून या दोघांमध्ये वाद झाले आणि त्यातून या अज्ञात इसमाने त्याच्याकडील कात्री आणि हातोडी च्या सहाय्याने वाईन शॉप चालकावर हल्ला चढवला. दुकानातील दोन जणांवर त्याने कात्रीने हल्ला केला, इतकंच नव्हे तर हल्ला केल्यानंतर तिथेच उभं राहून हल्लेखोर दारूही प्यायला. हा सगळा प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला. या हल्ल्यात वाईन शॉपमधील दोघांना गंभीर इजा झाली असून टिटवाळा पोलिसांनी अज्ञात हल्लेखोराविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web