प्रतिनिधी.
मुंबई – लॉकडाऊन मुळे शाळा बंद आहेत.ऑनलाईन शिक्षण जरी शाळांनी सुरु केले असले तरी गरीब विद्यार्थांना ते घेण्यासाठी खूप आडचणीचा सामना करावा लागतो . त्यामुळे गरीब,गरजू विध्यार्थ शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सुर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या नावे मोफत लाॅकडाऊन कोचिंग क्लासेसची सुरुवात केली आहे. सरकारच्या सर्व मार्गदर्शक तत्वाचे पालन करून वंचित बहुजन आघाडी कुर्ला विधानसभा, मेत्ता संस्था तसेच स्वप्नील जवळगेकर यांच्या पुढाकाराने हनुमान नगर कुर्ला पुर्व येथे गरीब, गरजू आणि वंचित विध्यार्थ्यांसाठी सुर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर मोफत कोचिंग क्लासेसची सुरुवात करण्यात आली आहे. या क्लासमधे तब्बल ३० विद्यार्थी असून दोन बॅच मधे क्लासेसचे वर्ग चालतात. सुप्रिया मोहिते, सारीका जवळगेकर,अनिल मस्के, शैलेश सोनावने, अमोल पगारे, स्वप्नील जवळगेकर यांनी सहकार्य केले.