कल्याण मध्ये खाजगी लॅबची कारागिरी,रुग्णाच्या ब्लडचा चुकीचा रिपोर्ट

प्रतिनिधी.

कल्याण – कल्याणमध्ये खाजगी लॅबचा प्रताप उघड झाला आहे. चुकीचा ब्लड रिपोर्ट दिल्याने कोरोना बाधित व्यक्तिच्या मुलाला प्लाज़्मा थेरपी मिळविण्यासाठी 48 तास वणवण फिरावे लागले.अखेरीस त्यांच्या वडिलांचा ब्लड ग्रुप दुसरा असल्याचे उघड झाले.त्यामुळे त्याच्या वडिलांना उपचार मिळण्यात विलंब झाला आहे.आता या प्रकरणी माजी नगरसेवक कुणाल पाटील संबंधित लॅब आणि डॉक्टरच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे.

कल्याण पूव्रेतील टाटा नाका परिसरात राहणारे सुरेंद्र साहू यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर कल्याण पूर्वेतिल आयुर या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. आत्तार्पयत त्यांच्या उपचारावर 2 लाख रुपये खर्च झाला आहे. अखेरीस डॉक्टर सांगीतले की, सुरेंद्र यांना प्लाज़्मा थेरपी द्यावी लागेल. त्यासाठी ब्लड टेस्ट करण्यात आले. सुरेंद्र यांचा ब्लड ग्रुप बी पॉझीटीव्ह असल्याचे सांगत लवकरात लवकर प्लाज़्मासाठी या ब्लड ग्रुपचा ब्लड डोनर उपलब्ध करा. सुरेंद्र यांच्या मुलाने वडिलांचा जीव वाचविण्यासाठी बी पॉझीटीव्ह ब्लड ग्रुप असलेल्या व्यक्तीचा शोध घेतला. 48 तासानंतर एक डोनर समोर आला. डोनरला घेऊन सुकेश हा दुसरा  लॅब मध्ये गेला. यावेळी जेव्हा परत सुरेंद्र यांची ब्लड टेस्टची चाचणी करण्यात आली. तेव्हा सुरेंद्र यांचा ब्लड ग्रुप ही बी पॉझीटीव्ह नसून एबी पॉझीटीव्ह असल्याचे उघड झाले.

ही धक्कादायक बाब सुकेश साहू यांनी माजी नगरसेवक कुणाल पाटील यांना सांगितली असता पाटील यांनी त्वरित हेल्थकेअर लॅब चालकाशी संपर्क साधला. आश्चर्य म्हणजे त्यावेळी हेल्थ केअर लॅबचे चालक राकेश शुक्ला यांनी चूक मान्य केले की, त्यांच्याकडून या रिपोर्टमध्ये काही तरी चूक झाली आहे.मात्र माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी संबंधित लॅब चालक व जबाबदार असलेल्यांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web