भिवंडी इमारत दुर्घटना स्थळी वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख यांची भेट

प्रतिनिधी.

ठाणे – भिवंडी शहरातील पटेल कंपाऊंड येथील जीलानी बिल्डिंग इमारत दुर्घटनास्थळी वस्त्रोद्योग व मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी भेट देऊन सुरू असलेल्या बचावकार्याचा आढावा घेतला. दुर्घटनेस 60 तास झाले तरी बचावकार्य अद्याप सुरु आहे. एन डी आर एफ च्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करुन बचावकार्याबाबत सुचना केल्या. यावेळी श्री शेख यांनी घटनेतील दुर्घटनाग्रस्तांना मुख्यमंत्री आणि राज्य सरकार सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर इतर इमारतींच्या अनुषंगाने योग्य ती खबरदारी घेण्याचे व तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हा व मनपा प्रशासनास दिले. इमारत दुर्घटनाग्रस्त भागाला भेट दिल्यानंतर त्यांनी महापालिकेत मनपा आयुक्त पंकज आशिया वअन्य अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीत शहरातील अनधिकृत व अति धोकादायक इमारतींबाबत तसेच त्यासाठी प्रशासनपातळीवर सुरु असलेल्या कार्यवाहीबाबत सविस्तर आढावा घेतला. या इमारतींच्याबाबत लवकरच शासन स्तरावर धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन श्री अस्लम शेख यांनी यावेळी उपस्थित शिष्टमंडळास दिले.यावेळी भिवंडी उपविभागीय अधिकारी मोहन नळदकर, मनपा आतिरिक्त आयुक्त दिवटे यांसह लोकप्रतिनिधी व अन्य अधिकारी उपस्थित होते.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web