प्रतिनिधी.
कल्याण – ठाणे जिल्ह्यातील कल्याण ,अंबरनाथ ग्रामीण भागात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने भात शेतीला मोठा फटका बसला आहे.सोसाट्याच्या वाऱ्यासह दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने ग्रामीण भागातील भात शेतीला त्याचा मोठा फटका बसला आहे.कल्याण ग्रामीण भागातील नुकसान ग्रस्त भात शेतीची मा. नगरसेवक कुणाल पाटील यांनी पाहणी केली असून शेतीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी राज्य शासनाकडे केली आहे.
महाराष्ट्रभर होत असलेल्या परतीच्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झालेले आहे. शेतात उभी राहिलेली पिके काही क्षणात जमीन दोस्त झालेली आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेचे मा. नगरसेवक कुणाल पाटील यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली आहे.शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, शेतकऱ्यांचे उदरनिर्वाहाचे साधन म्हणजेच शेती त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन तातडीने कारवाई करण्याचे आदेश संबधित विभागास द्यावेत व शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळवून द्यावा अशी मागणी कुणाल पाटील यांनी महाराष्ट्र शासनाकडे केली आहे.