मास्‍क न वापरणा-या दुकानदारा विरूध्‍द पालिका आयुक्‍तांची दंडात्‍मक कारवाई

प्रतिनिधी.

कल्याण – महापालिका क्षेञात अजुनही ब-याच ठिकाणी विशेषतः मार्केट परिसरात गर्दी होत असल्‍याचे निदर्शनास येत आहे आणि कोरोना साथीचा प्रादुर्भावही मोठया प्रमाणात होताना दिसुन येत आहे. त्‍यामुळे पालिका आयुक्‍तांनी आज अचानक कल्‍याण पश्चिम मधील झुंजारराव मार्केट परिसराला भेट देवून तेथील दुकानांची पाहणी करून, सदर दुकानदार मार्गदर्शन सुचनांचे पालन करतात किंवा कसे? ( उदा. दुकानात सॅनिटायझर ठेवणे, दुकानातील कर्मचा-यांनी मास्‍क परिधान करणे , सोशल डिस्‍टंसिंगचे पालन करणे इ.) याची माहिती घेतली आणि अशा प्रकारे सुचनांचे पालन न करणा-या एका दुकानदारास रू.5000/- चा दंड ठोठावण्‍याची धडक कारवाई केली.कोरोना साथीच्‍या वाढत्‍या प्रादुभावामुळे सावर्जनिक ठिकाणी वावरणा-या नागरिकांवर मास्‍क न घातल्‍यास दंडनिय कारवाई करायच्‍या सक्‍त सुचना आयुक्‍त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यापूर्वीच सर्व प्रभागक्षेञ अधिकारी यांना दिलेल्‍या आहेत. त्‍यानुसार महापालिकेच्‍या भरारी पथकांनी काल तब्‍बल दोन लाख रूपये दंड स्‍वरूपात वसुल केले आहेत.नागरिकांनी देखील संसर्गाचा धोका टाळण्‍यासाठी मास्‍क न घालता बाहेर वावरू नये, परिधान केलेला मास्‍क वारंवार काढू नये, आपल्‍या सुरक्षिततेसाठी मास्‍क वापरावा तसेच ज्‍या दुकानात मास्‍क घालत नसतील त्‍या दुकानात जावु नका असे आवाहन आयुक्‍त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी केले, यासमयी पोलिस उपायुक्‍त विवेक पानसरे , ब प्रभागक्षेञ अधिकारी सुहास गुप्‍ते , क प्रभागक्षेञ अधिकारी भागाजी भांगरे त्‍यांचे समवेत होते

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web