भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली

प्रतिनिधी.

भिवंडी – आज पहाटे ०३:४० वाजताच्या सुमारास धामणकर नाका जवळ, पटेल कंपाऊंड, नारपोली, भिवंडी येथे जिल्हानि(तळ+तीन मजली) इमारतीचा भाग कोसळला आहे. या ठिकाणी बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू असून घटनास्थळी भिवंडी अ. केंद्राचे ३ फा. वा. उपस्थित आहेत. या घटनेत ढिगाऱ्याखाली अनेक रहिवासी अडकल्याची शक्यता असल्याने बचाव कार्यात मदत करण्यासाठी मा. ठाणे पामहापालिका आयुक्त विपिन शर्मा(भा.प्र.से.) यांच्या आदेशान्वये ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे(१५ जवान, १ ड्रायव्हर, १ टेम्पो, १ पिकअप) दाखल झाली आहे. तसेच राष्ट्रीय आपत्ती दलाची एक तुकडी(३० जवान) दाखल झाले आहेत.आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू, ३५ जण ढिगार्‍याखाली अडकले

आतापर्यंत आठ मृतांचे शव ढिगार्‍याखालून तर पाचजणांना जिवंत बाहेर काढण्यात बचाव पथकाला आले आहे.

Share via
  •  
  •  
  •  
  •  
  •  

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web