महाराष्ट्र बँकेच्या वतीने राष्ट्रीय पोषण माह निमित्त कार्यक्रमाचे आयोजन

संघर्ष गांगुर्डे

मुरबाड – १ ते ३० सप्टेंबर २०२० राष्ट्रीय पोषण माह जाहीर करण्यात आला असून ‘सही पोषण देश रोशन’ या संकल्पनेचा प्रचार व प्रसार करण्या करिता व त्याच बरोबर बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त १६ सप्टेंबर रोजी बँक ऑफ महाराष्ट्र विभागीय कार्यालय ठाणे यांच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन माळ ता,मुरबाड जि ठाणे येथे करण्यात आले अग्रणी बँकेचे मुख्य प्रबंधक श्री भारती तसेच या कार्यक्रमास सहभाग देणारे RSETI चे संचालक श्री निमकर
आणि आर्थिक साक्षरतेच्या सविता पावसकर व RSETI च्या प्रशिक्षक अलका देवरे उपस्थित होते. गावचे सरपंच अंगणवाडी सेविका सुपर वायझर निशा तरमल सरपंच विज्यभाऊ देसले व शीरोशी शाखेच व्यवस्थापक व इतर मान्यवर यांच्या उपस्थित मार्गदर्शन करण्यात आले. आरोग्याचे महत्व, लहान बालकांचे माता गर्भवती स्त्री त्यांचा आहार ,स्तनदां माता यांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. त्याच बरोबर बँकेत जनधन योजने अंतर्गत बँक खाती उघडणे व बचतीची सवय लावावी सामाजिक सुरक्षा योजना, व्यावसायिक प्रशिक्षण याबाबत माहिती देण्यात आली तसेच पोषण आहाराचे वितरण करण्यात आले.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web