सर्वांसाठी लोकलसेवा सुरू करण्याची मनसे आमदाराची मागणी

डोंविवली :  बसने प्रवास केल्यावर कोरोना होत नाही का? असा सवाल राजू पाटील यांनी ट्विट करत केला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजू पाटील यांनी ट्विट करत हा सवाल विचारला असून सर्वसामान्य प्रवाशांसाठी लवकरात लवकर लोकलसेवा सुरू करण्याची मागणी केली आहे. बदलापूर,अंबरनाथ, कल्याण,डोंबिवली आणि दिवा येथील नागरिक बससाठी तासनतास रांगा लावत आहेत, रस्त्यावर पडलेले खड्डे, वाहतूक कोंडी यामध्ये सर्वसामान्य प्रवासी भरडला जात असून 5 ते 6 हजार रुपये भाड्यात खर्च होतो ते कसे परवडेल असेही पाटील म्हणाले आहे. सरकारने दिलासा द्यावा, असं राजू पाटील यांनी म्हटलंय.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web