मुंबईत पोलिसांच्या फिटनेससाठी वंचित बहुजन आघाडीचा पुढाकार

संघर्ष गांगुर्डे

मुंबई – पोलिसांनी आहार व व्यायामासाठी वेळ द्यायला हवा. पोलीस सतत नागरिकांच्या संपर्कात असतात. कोरोना साथीच्या काळात पोलिसांच्या वेळोवेळी शारीरिक तपासण्या होणे आवश्‍यक आहे. सध्या पोलीस वॉरिअरच्या भूमिकेत आहेत. जीवाची पर्वा न करता अहोरात्र ते काम करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पोलिसांसाठी आरोग्य तपासणी शिबीर तथा योगिक एक्युथेरिपी कॅम्प घेण्यात आले.

या शिबिरामुळे पोलिसांचा फिटनेस समजण्यास मदत होणार आहे. अनेक पोलिसांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून बहुजन आघाडी कुर्ला विधानसभा स्वप्नील जवळगेकर यांच्या पुढाकार घेऊन हा उपक्रम राबवला आहे.

‘पोलिस नागरीकांसाठी अहोरात्र पहारा देत आहेत. जिथं कोणीही लवकर पोहचत नाही अशा ठिकाणी आमचा पोलीस बांधव सेवा देत असतो. हा आमच्या कर्तव्याचा भाग असून ते कर्तव्य पार पाडण्याची जबाबदारी सध्या पोलीस चोखपणे पार पाडत आहेत. अशा कठीण परिस्थितीत पोलिसांचे शारीरिक स्वास्थ्य जपण्याचे काम व.ब.आघाडीने केले आहे’. शिबिरासाठी नेहरु नगर पोलिस ठाणे वरीष्ठ पोलिस निरीक्षक विलास शिंदे यांनी सहकार्य केलं.

हिलर थोरेपिस्ट – डाॅ.इम्रान चिकणी,रमेश सिताराम मोहिते,राहुल कांबळे,विनित ठाकुर ,तृप्ती संतोष मोरे ,धमेंद्र राणे,गंगाधर माळी,हेमंत तांडेल,विकास संसारे

माहिला जिल्हा अध्यक्ष -कृतिका जाधव तसेच संध्या पगारे,मालती वाघ,सारीका जवळगेकर,सुप्रिया मोहिते.
वंचित बहुजन आघाडीचे कुर्ला विधान सभेचे कार्यकर्ते-स्वप्निल जवळगेकर,अनिल मस्के,रोहित जगताप ,शैलेश सोनवने,अमोल पगारे,रोहित जवळगेकर,अभिजीत पगारे,प्रकाश पगारे,स्वयम सोनवने,संदिप वाघमारे,माया येडे,तेजस वाघमारे उपस्थित होते

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web