खडकपाडा पोलिसाची धडकेबाज कामगिरी, अट्टल चोरटा जाळ्यात

प्रतिनिधी.

कल्याण – कल्याण डोंबिवली शहरात दुचाकी चोरी व चैन स्नेचीगच्या घटना वाढल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली होती .खडकपाडा पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीच्या दाखल गुन्ह्यातील आरोपी कल्याण नजिक आंबिवली येथील इराणी वस्ती येथे येणार असल्याची माहिती खडकपाडा पोलीस ठाण्याचे सहाययक पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या पथकाला मिळाली त्यांनी या ठिकाणी सापळा रचत सिध्दार्थ उर्फ विक्की कंबळे याला अटक केली .त्याच्या चौकशी दरम्यान विक्की आपले साथीदार राजू वाघ,फारुख इराणी,इन्नू इराणी ,अली इराणी यांच्यासोबत पार्किंग मधील महागड्या मोटरसायकल चोरी करत असे तसेच या मोटरसायकलवरून ही टोळी कल्याण डोंबिवली सह ठाणे नाशिक आदी ठिकाणी चैन स्नेचिंग करत असल्याचे उघड झाले .पोलीस विक्कीच्या फरार साथीदारांचा शोध घेत आहेत .विक्की कडून त्यांनी चोरी केलेल्या 16 मोटरसायकल हस्तगत केल्या।आहेत तसेच ठाणे आयुक्तालयातील 10 मोटरसायकल चोरीचे व नाशिक येथिल चैन स्नेचिंग चे गुन्हे उघडकीस आनले आहेत .

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web