सर्वपक्षीय कोरोना परिषदेमध्ये झाले राजकारण,शिवसेनेचा आरोप

प्रतिनिधी.

डोंबिवली – डोंबिवलीत काल कोरोना परिषद पार पडली.यात सर्व पक्षीय सदस्य व संघटनांनी उपस्थित लावली.कोरोनावर मात करण्यासाठी काय उपाययोजना केल्या जाव्यात यावर चर्चा झालीं तसेच आयुक्तांना 15 सूचना लेखी स्वरूपात देण्यात येणार असून त्याचा ठरवा करण्यात आला. सूचना आणि पत्र  दिल्यानंतर प्रशासन आणि आयुक्त यांना 14 दिवसाचा कालावधी देण्यात येणार असून कोरोनावर आणि केडीएमसी क्षेत्रात योग्य उपाययोजना कराव्यात अन्यथा आयुक्त हटवा अशी मागणी केली जाईल असे सांगितले होते.मात्र कोरोना परिषदेत राजकारण झाले. मध्येच आयुक्त हटाव हा मुद्दा आणला असा आरोप शिवसेना करत केडीएमसी आयुक्तांची पाठराखण केली आहे.शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमुख तथा विद्यमान नगरसेवक राजेश मोरे यांनी पत्रकार परिषद घेत आयुक्त हे चांगले काम करीत असून त्यांना उगाच नाहक त्रास दिला जात आहे. आम्ही आयुक्तांच्या पाठीशी कायम राहून प्रशासनास सहकार्य करण्याची आमची भूमिका राहील. असे सांगितले 

कोरोना परिषदेत घेतलेल्या आयुक्त हटाव भूमिकेचा त्यांनी निषेध  केला. त्याच बरोबर दोन्ही आमदारांनी जे राजकारण केले त्याचा निषेध नोंदविला तसेच या पुढच्या परिषदेत शिवसेना नसणार अशी भूमिका घेतली.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web