मनसेचा इशाऱ्यानंतर कामगारांना पुन्हा घेतले कामावर

प्रतिनिधी.

अंबरनाथ – अंबरनाथ औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या पीएसार या प्रिंटिंग कंपनी मध्ये काम करणाऱ्या कामगारांना अचानक कामावरून काढण्यात आले होते. या नंतर कामगारांनी थेट मनसे आमदार राजू पाटील यांची भेट घेत आपली कैफियत त्यांच्या समोर मांडली होती. त्यानंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी ठेकेदाराशी संपर्क साधत कामगारांना कामावर घेण्यास सांगितले होते.

अंबरनाथ औद्योगिक क्षेत्रात असलेल्या पिआरएस या कंपणीमाध्ये कामगार मोठ्या प्रमाणात काम करत आहेत. या कंपनीत गेल्या २० ते २५ वर्षापासून काम करणाऱ्या कामगारांना अचानक घरचा रस्ता दाखवत नव्या कामगारांना कामावर घेण्याची प्रक्रिया ठेकेदाराने सुरू केली होती. त्यानंतर मनसेचे शहर अध्यक्ष कुणाल भोईर यांनी पदाधिकाऱ्यांसह कंपनीला भेट दिली होती. कामगारांवर होत असलेला अन्याय त्यांनी ठेकेदाराला समजावून सांगत त्यांना पुन्हा रुजू करा अशी विनंती मनसेने त्यांच्या कडे केली होती. त्यानंतर ठेकेदाराने देखील १५ कामगारांना कामावर रुजू करून घेतले आहे.तर येत्या कालखंडात अन्य कामगारांना कामावर रुजू करण्याचे अश्वासर ठेकेदाराने मनसेला दिले आहे.जर औद्योगिक क्षेत्रात मराठी माणसावर अन्याय केल्यास ते खपवून घेतले जाणार नाही असा इशारा मनसेने दिला आहे. मनसेच्या मागणी नंतर ठेकेदार प्रशासनाने १५ कामगार कामावर घेतले आहेत.तर उर्वरित कामगारांना देखील कामावर घेतले जाईल असे आश्वासन ठेकेदाराने दिले आहे.या वेळी जिल्हा संघटक संदीप लकडे ,शहर अध्यक्ष कुणाल भोईर, अंकित कांबळे आणि मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web