कल्याण मध्ये समर्पित कोविड रुग्णालयाचे पालकमंत्री यांनी केले लोकार्पण

प्रतिनिधी.

कल्याण – कल्याण परिसरातील #कोविड१९ रुग्णांना या रुग्णालयाच्या उपलब्धतेमुळे ताबडतोब तसेच सर्वोत्तम वैद्यकीय उपचार देणे शक्य होणार असून कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांच्या रिकव्हरी रेट वाढण्यास निश्चितपणे यश मिळेल
जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने कल्याण पश्चिम येथील वसंत व्हॅली विभागात उभारण्यात आलेल्या समर्पित कोविड रुग्णालयाचे लोकार्पण आज पालकमंत्री मा.ना.एकनाथ शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सदर रुग्णालयाच्या माध्यमातून ५४ ऑक्सिजन बेड्स तसेच ९ आयसीयू बेड्सची व्यवस्था उपलब्द्ध करून देण्यात आली असून याप्रसंगी पालकमंत्री मा.ना.एकनाथ शिंदे साहेब यांनी नव्याने उभारण्ययात आलेल्या सदर रुग्णालयाच्या व्यवस्थापनाची पाहणी करून संबंधित अधिकारी वर्गास निर्देश दिले व डॉक्टर आणि सपोर्टींग स्टाफचे कौतुक करीत मनोबल वाढवले.यावेळी ऑक्सिजनचा मोठ्या तुटवडा जाणवतो आहे प्रश्न विचारले असता राज्यसरकारने निर्णय घेतला असून ऑक्सिजन 80% कोविड साठी वापरला जाणार असून 20% ऑक्सिजन हा औद्योगिक वापरासाठी याचा निर्णय झालेला त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही असे पालकमंत्री यांनी सागितले.

या लोकार्पण सोहळया समयी पालकमंत्री मा. एकनाथजी शिंदे, आमदार मा. रविंद्र चव्हाण, महापौर विनिता राणे, आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी, मा. नगरसेवक सुनील वायले,  सभापती स्थायी समिती विकास म्हात्रे, सभागृह नेते प्रकाश पेणकर, विरोधी पक्षनेते राहुल दामले, अतिरिक्त आयुक्त  सुनिल पवार, शहर अभियंता सपना कोळी- देवनपल्ली, उपयुक्त पल्लवी भागवत, महापालिका सचिव संजय जाधव, वैदयकिय आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी पाटील, साथरोग नियंञण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील, डॉ. सरवणकर, प्रभागक्षेत्र अधिकारी सुहास गुप्ते  तसेच इतर पालिका सदस्य, पालिका अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

 

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web