कल्याण गुन्हे शाखेतील ए.एस.आय. सिद्धार्थ गायकवाड यांच कोरोना मुळे निधन

प्रतिनिधी.

कल्याण – कल्याण पश्चिमेतील उंबर्डे या गावाचे स्थानिक भूमिपुत्र आणि पोलीस खात्यात एक सच्चा आणि कार्यक्षम अधिकारी म्हणून त्यांची ख्याती होती. राज्य शासनाचे पुरस्कार सिद्धार्थ गायकवाड यांना मिळाले होते. कोरोनाची लागण झाल्याने ते रुग्णालयात त्याचे उपचार सुरू होते मात्र उपचार  दरम्यान आयुर रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मावळली त्यांच्या निधनाच्या वृत्ताने पोलीस खात्यासह कल्याण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 
 

कल्याण गुन्हे अन्वेषण विभागात ए. एस .आय. सिद्धार्थ गायकवाड  कार्यरथ होते. ते ५६ वर्षाचे होते. पोलीस खात्यात एक भूमिपुत्र म्हणून ओळख होती कल्याण पश्चिमेतील उंबर्डे हे त्यांचे मुळगाव. कोरोनाने त्यांचे निधन झाले खासगी आयुर रुग्णालयात त्याचे उपचार सुरू होते अचानक त्याची प्रकृती खालावली व त्यातच त्याची प्राणज्योत मावळली. कल्याण तालुक्यात पोलीस ऑफिसर, एक सच्चा मित्र, संविधानाशी,आपल्या कर्तव्याशी,अत्यंत प्रामाणिक असलेला , समाजाची बांधिलकी असलेला, गोरगरिबांना मदत करणारा, रियल कोरोना  योद्धा आणि जनतेची सेवा करत असतांना सिद्धार्थ गायकवाड  यांनी कोरोनाने निधन झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.  

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web