डोंबिवलीत अंगणवाडीतील पुरक पोषक आहारामध्ये काळाबाजार,महिला गजाआड

प्रतिनिधी.

डोंबिवली – अंगणवाडी मधील लहान मुलांना व गर्भवती महीलांना शासनाकडुन पुरक पोषक आहार दिला जातो, यामध्ये “भ्रष्टाचाराची किड” लागली आहे.निळजे सेक्टर, डोबिवली पुर्व अंतर्गत येणा-या अंगणवाड़ी मधिल लहान मुलांना व गर्भवती महीलांना शासनाकडुन पुरक पोषक आहार योजनेतील जिवनावश्क वस्तुच्या वितरणात अनियमीतता होत असल्याबाबत गोपनिय माहिती जिल्हा परीषद ठाणे, अधिकारी संतोष भोसले आणि जिल्हा परिषद सद्यस रमेश पाटील यांना मिळाली माहीती मिळाली. त्यांनी ही माहिती लगेच मानपाडा पोलिसांना कळवली. तात्काळ मानपाडा पोलिसांनी ट्रॅप लावत काळाबाजार होत असलेला टेम्पो रंगेहात पकडला आहे. या टेम्पो मध्ये तेल, गहू, तांदूळ, हळद, मसाला, साखर यांची पाकिटे आणि इतर आवश्यक असलेले वस्तू आढळून आल्या. अन्नधान्य आणि साहित्याची एकूण किंमत 59,813 इतकी असून सर्व माल पोलिसांनी जप्त केला आहे.सदर काळाबाजार अंगणवाडी परिवेक्षिका सुषमा घुगे ही करत असून पोलिसांनी रंगेहात पकडले असून कलम ४२० आणि ४०९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web