वनरुपी क्लिनिकच्या वतीने केडीएमसी पत्रकार कक्षात हँण्ड सॅनिटाइज मशीन

कल्याण – कल्याण डोंबिवलीमधील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोना विषाणूपासून बचाव व्हावा यासाठी वनरुपी क्लिनिकच्या वतीने स्तुत्य उपक्रम राबिवले जात आहे    कल्याण डोंबिवली तसेच ठाणे परिसरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये हँण्ड सॅनिटाइज मशीन बसविण्यात आल्या आहेत. अशाच प्रकारची हँण्ड सॅनिटाइज मशीन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पत्रकार कक्षात आणि इतर विभागात देखील बसविण्यात आल्या.त्यामुळे सर्वच स्तरातून सामाजिक संघटनेचे कौतुक केले जात आहे .

 वन रुपी क्लिनिकच्यावतीने मुंबई उपनगरमध्ये १९ रेल्वे स्टेशनवर माफक दरात आरोग्य सेवा देण्यात येत असून डोंबिवलीतील पाटीदार भवन आणि सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुल येथील कोविड सेंटरचे व्यवस्थापन देखील करत आहेत. हे करत असतांनाच वन रुपी क्लिनिकचे डॉ. राहुल घुले यांच्यावतीने ठाणे जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयात हँण्ड सॅनिटाइज मशीन देण्यात आल्या आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयातील पत्रकार कक्षात मोठ्या संख्येने पत्रकार तसेच राजकीय, सामाजिक कार्यकर्ते यांची ये जा असते. त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हँण्ड सॅनिटाइज मशीन बसवली असून नितीन शिंपी यांनी हि मशीन कार्यान्वित केली आहे. कोरोना महामारीत नागरिकांना , कर्मचारी , अधिकारी वर्ग , पत्रकार  याना प्रादुर्भाव होऊन म्हणून सुरक्षा उपकरणे उपलब्ध करून सामाजिक वसा जपत आहेत .

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web