उल्हासनगर महापालिकेच्या डम्पिंगला ग्रामस्थाचा विरोध,शिवसेना आमदाराचा केला निषेध

 
 प्रतिनिधी.

कल्याण – मलंगगडच्या पायथ्याशी आणि कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रात येणारे उसाटणे गावात उल्हासनगर महापालिकेचे डम्पिंग येत असल्याने आज ग्रामस्थांनी विरोध केला आहे.तर मागणी करणाऱ्या शिवसेना आमदार बालाजी किणीकर यांचा देखील ग्रामस्थांनी यांचा निषेध केला.

 कल्याण जवळील मलंगगड परिसराला औद्योगिक करणाने वेधले आहे.मात्र आता याच परिसरात 3 रे डंम्पिंग ग्राउंड येणार आहेत. त्यामुळे आता निसर्गाने आणि वन्यसृष्टीने नटलेले मलंगगड आणि परिसराला धोका पोचणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी डम्पिंग विरोध केला आहे.

सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये वसलेल्या मलंगड भागात आणि परिसरात जंगल आणि डोंगराळ भाग अधिक येत असल्याने वन्य जीवांचा वावर मोठ्या प्रमाणात आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेचे डम्पिंग भाल गावात येणार आहे तर करवले गावात मुंबई महापालिकेचा डम्पिंग येणार आहे आणि आता त्यात उल्हासनगर महापालिकेची भर पडली असून त्याच्या डम्पिंगसाठी कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रातील उसाटणे येथे येणार असून त्याला काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे.त्यामुळे ग्रामस्थांनी याला विरोध करत आमदार बालाजी किणीकर यांचा निषेध केला. बालाजी किणीकर आमदार अंबरनाथचे असून उल्हासनगर महापालिकेसाठी डम्पिंग उसाटणे गावात आणल्याने स्थानिकांनी निषेध केला.ग्रामपंचायत दत्तक घेतली आणि सोयी देण्यापेक्षा डम्पिंग आणले असे ग्रामस्थांनी म्हणणे आहे.

 उसाटने गावात येणाऱ्या डंम्पिंगने एक महाविद्यालयासह जिल्हापरिषद शाळा आणि अनेकांची घरे देखील बाधित होणार आहेत.त्यामुळे या परिसरातील गावांनी या डंपिंग ग्राउंडला कडाडून विरोध केला आहे. तर आमदार बालाजी किणीकर यांनी आमची फसवणूक केल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली आहे. त्याच बरोबर ग्रामस्थांनी तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

 

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web