केडीएमसी खड्ड्याची महापालिका? माजी नगरसेवकाने स्वखर्चाने बुजवले खड्डे

प्रतिनिधी.

कल्याण – कल्याण शीळ रोड,मलंग रोड,पत्रिपुलासह मुख्य रस्त्यावर खड्ड्यामुळे वाहतूक कोंडी होते यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे नागरिकांना ही दररोज त्रास सहन करावा लागत आहे. वारांवर तक्रारी करून देखील पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे कल्याण मलंग रोड वर तीन जनांचा बळी गेला तर अनेक अपघात ही घडले आहेत. महापालिकेचं दुर्लक्ष होत असल्याने नगरसेवक कुणाल पाटील यांनी स्वतः पुढाकार घेत स्वखर्चाने खड्डे भरण्यास सुरुवात केली आहे . त्याच बरोबर त्यानी पालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केला आहे. त्त्यायाच बरोबर निषेध हि नोंदवला आहे .याबाबत विचारणा केली असता पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी खड्डे बुजवण्याचं काम सुरू आहे. निधीची कमतरता नाही असे सांगितले आहे .मात्र जर निधी आहे तर खड्डे बुजवून नागरिकांना होणारा त्रास का कमी केला जात नाही असा सवाल सामान्य लोकांकडून उपस्थित केला जात आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web