आर.पी.एफ.जवानाच्या समय सुचकेतेमुळे महिलेला मिळाले जीवनदान

प्रतिनिधी.

कल्याण – कल्याण पश्चिमेतील रामबाग परिसरातील एका ५४ वर्षीय महिलेचा पुष्पक एक्स्प्रेस खाली आत्महत्या करण्याचा  प्रयत्न रेल्वे पोलीस फोर्सचे जवान जितेंद्र कुमार यादव यांच्या समय सूचकतेमुळे  महिलेला जीवनदान मिळल्याची घटना कल्याण रेल्वे स्थानक नजीक कसारा रेल्वे लोहमार्गावर रविवारी सकाळी घडली.चित्तथरारक दृश्य बघून  प्रवासी थक्क झाले होते .
                     रेल्वे पोलीस फोर्सचे जवान कल्याण लोको शेड येथुन आपली ड्युटी संपवुन परतत असताना रविवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास कल्याण स्टेशन नजीक कसारा रेल्वे लोहमार्गावर एक ५४ वर्षीय महिला कसारा रेल्वे ट्रॅकला अगदी कडेला उभी होती. समोरून  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडुन लखनऊ कडे जाणरी पुष्पक एक्स्प्रेस येत होती. आर.पी.एफ. जवान जितेंद्र यादव यांनी तिला एक्स्प्रेस येत असल्याचे सांगितले व  रेल्वे ट्रॅकपासुन बाजु होण्यास सांगितले परंतु आत्महत्या करण्याच्या उद्देशाने आलेल्या महिला सरळ रेल्वे ट्रॅकमध्ये झोपली.
आर.पी.एफ. जवान जितेंद्र यांनी येणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसच्या डा्व्हयरला ओरडत इशारा केला. गाडीची गती कमी असल्याने इंजिन ती रेल्वे ट्रॅकमध्ये असलेल्या स्थितीत पास झाले. दुसरा डबा पास होण्याआधी तिला समयसूचकता दाखवित जितेंद्र यांनी रेल्वे रुळामधुन बाहेर खेचुन तिला बाहेर काढले. तातडीने घटनास्थळी रेल्वे स्टाफ पोहचत त्यांनी उपाचारार्थ रूक्मिणी बाई रूग्णालयात नेले. आर.पी.एफ जितेंद्र कुमार यादव यांच्या समयसुचकेतेमुळे त्या माहिलेला जीवनदान मिळाले आहे. त्यामुळे कोरोना काळात नागरिक एकमेकांना स्पर्श करायला घाबरतात अशा वेळी आपले कर्तव्याची जाण ठेवत महिलेचे प्राण वाचवल्याने सर्वच स्तरातून जवानांचे कौतुक केले जात आहे .

Share via
  •  
  •  
  •  
  •  
  •  

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web