बदलापूर – ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारं बदलापूरचं बारवी धरण अखेर तुडुंब भरूण वाहू लागले आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्याची वर्षभराची पाण्याची चिंता आता मिटली आहे.
गेल्या वर्षी ४ ऑगस्ट रोजी हे धरण भरून वाहू लागलं होतं. मात्र यंदा जून आणि जुलै महिन्यात पावसानं दडी मारल्यामुळे ४ ऑगस्ट रोजी या धरणात अवघा ४८ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे ठाणे जिल्ह्यावर पाणीकपातीचं संकट ओढावण्याची भीती व्यक्त होत होती. मात्र ऑगस्ट महिन्यात धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे ऑगस्ट महिन्या अखेर हे धरण तुडुंब भरून वाहू लागले आहे. हि ठाणे जिल्हा करिता आनंदाची बातमी आहे. रात्री एक वाजता बारावी धरण हे तुडुंब बरून वाहू लागले आहे