प्रतिनिधी.
डोंबिवली – कल्याण-डोंबिवली आणि ग्रामीण भागात मध्ये भाजपने विविध मंदिरा बाहेर सरकारच्या विरोधात घंटानाद आंदोलन केले.यावेळी सर्व देशात व भागत मंदिरे चालू झाली आहेत.कोरोनाचा संकट कमी होत असताना.हे शासन जाणीव पूर्वक मंदिरे खुली करत नाहीत.असा आरोप भाजप करत आहे. तर दुसरी कडे हे भाजप आंदोलन म्हणजे फक्त राजकारण करण्यासाठी आहे असे नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी म्हटले आहे.
जेव्हा नागरिक संकटात होते, जेव्हा नागरिकांना बेड मिळत नव्हते, नागरिकांना खरी गरज होती तेव्हा आंदोलन करणारे कुठे होते? गावाला जाऊन बसले होते का? असा जोरदार टोला भाजपच्या आंदोलनावर शिवसेना नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी भाजपला लगावला आहे.