या दोन गावात एकही गावकरी गणपती घरी आणत नाही

कल्याण ग्रामीण –  राज्यात,देशात किवा परदेशात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.सार्वजनिक असो किव्हा घरगुती गणपती सर्व आनंदाने गणेशोत्सव साजरा करतात. बाप्पाची मूर्ती आणून गणेश चतुर्थीला प्रतिप्रतिष्ठापना केली जाते.मात्र कल्याण ग्रामीण भागातील बाळे आणि वडवली गावात गेल्या दीडशे वर्षांपासून गणपतीं बाप्पाची मूर्ती कोणीही घरी आणत नाही आणि प्रतिप्रतिष्ठापना करत नाहीत.हे ऐकून आश्चर्य वाटले असेल ना….

राज्यात,देशात किवा परदेशात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.सार्वजनिक असो किवा घरगुती गणपती सर्व आनंदाने गणेशोत्सव साजरा करतात. बाप्पाची मूर्ती आणून गणेश चतुर्थीला प्रतिष्ठापना केली जाते.मात्र कल्याण ग्रामीण भागातील बाळे आणि वडवली गावात गेल्या दीडशे वर्षांपासून गणपतीं बाप्पाची मूर्ती कोणीही घरी आणत नाही आणि प्रतिष्ठापना करत नाहीत.तसेच सार्वजनिक मंडळ सुद्धा गणपती बसवत नाही.कारण या दोन्ही गावांच्या मध्यस्थानी असलेल्या स्वयंभू गणपती मंदिरामुळे….बाळे आणि वडवली या गावांमध्ये सुमारे साडे तीनशे ते चारशे घरे आहेत. मात्र यापैकी एकाही घरात गणेश चतुर्थीला गणपती आणला जात नाही. याचं कारण म्हणजे या गावांच्या मध्यभागी गणपतीचं मंदिर आहे.या 2 गावातील ग्रामस्थ याच गणपतीचं पूजन करतात. शेकडो वर्षांपासून हे चालत आहे. घरगुती किव्हा सार्वजनिक गणपती ऐवजी गणेशोत्सवा दरम्यान गावातील गणेश मंदिरात सात दिवस उत्सव साजरा केला जातो. यादरम्यान, गावातील मंडळी, तसेच बाहेरगावातून किर्तनकार प्रवचनकार मंडळी मोठ्या संख्येने मंदिरात येत असते. दरवर्षी मोठ्या उत्साहात हरिनामाचा जयघोष या मंदिरात साजरा केला जातो.रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील भाविक या मंदिरात येत असतात.मात्र यंदा कोरोनाचे सावट असल्याने मंदिरात कोणत्याही कार्यक्रमांचे आयोजन केले गेले नाही…

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web