प्रतिनिधी.
अकोला – वंचित बहुजन आघाडीने समान्य माणसाला न्याय मिळावा याकरिता घेतलेली भुमिका व लॉकडाउनमध्ये सर्वसामान्यांना दिलेला अधार यामुळे वंचित बहुजन आघाडीकडे अनेकांचा कल वाढला आहे. बारुल्यातील विशेषता कोळी समाजाचे सरपंच यांनी वंचित मध्ये प्रवेश केला. आज जिल्ह्यातील दहिहांडाचे सरपंच शांताराम दंदी, टकळीचे गणेश अग्रवाल, चोहट्ट्याचे सरपंच दिलिप वडाळ, रेलचे सरपंच शंकरराव घुगरे, करतवाडी चे सुदर्शन किरडे, टाकळी चे उपसरपंच मंगेश ताडे, चोहट्ट्याचे उपसरपंच श्रीकृष्ण लांडे, दनोरी चे गणेश बुटे, व कावस्याचे निलेश बगाडे यांनी ॲड बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत आज वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदिप वानखडे, कृषी सभापती पंजाबराव वढाळ यांच्या नेतृत्वाखाली व प्रदेश प्रवक्ता धैर्यवर्धन पुंडकर, जि प अध्यक्ष प्रतिभा भोजने, गटनेता ज्ञानेश्वर सुलताने, सभापती सुशांत बोर्डे, सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी, सभापती आकाश शिरसाट, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख डॉ प्रसन्नजीत गवई, दिपक गवई, दिनकरराव खंडारे, पराग गवई, संजय बावणे, हितेश जामनिक, राजकुमार दामोदर, आदेश खाडे, किशोर जामनिक, प्रा शैलेश सोनोने, संजय पाटिल, प्रकाश प्रधान, जयराज चक्रनारायन, अनुकूल ठाकरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला. यावेळी प्रवेश केलेल्या सर्वांचे पक्षात स्वागत करण्यात आले या प्रसंगी सरपंचांनी केवळ वंचित बहुजन आघाडीतच सन्मानाची वागणूक मिळत असल्याने आपण प्रवेश केल्याचे सांगितले.
