प्रतिनिधी.
अंबरनाथ – प्रलंबित रस्ते, रस्त्यावर पडलेले खड्डे आणि तोंडावर असलेला गणेशोत्सव हे लक्षात घेता सामान्य नागरिकांना नाहक त्रास होत असल्याने वंचित बहुजन आघाडी अंबरनाथ शहराच्या वतीने इशारा आंदोलन करण्यात आले. गणेश विसर्जनाआधी जर रस्त्याचे काम, खड्डे पडलेले ठिकाण दुरुस्त न झाल्यास नगर पालिके समोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे अंबरनाथ शहराचे युवा नेते प्रविण गोसावी यांनी दिला आहे.ना दुरुस्त रस्ता आणि गणेश विसर्जना दरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास यांस सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असेही मा. मुख्याधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.याप्रसंगी श्री संतोष कुऱ्हाडे, श्री कैलास डोंगरे, श्री. रामदास ननावरे,श्री मनोहर पाटील श्री. देवरावजी गजभिये, श्री राहुल घोडेस्वार, श्री. अतुल डोंगरे, श्री. निलेश भवरे इतर सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
