सार्वजनिक उत्सवासाठी मुंबई महापालिका क्षेत्रात नऊ तपासणी पथक

प्रतिनिधी.

मुंबई– सार्वजनिक उत्सवासाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपांच्या तपासणीसाठी मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुंबई महानगरपालिका क्षेत्रात तीन समित्या व नऊ पथकांची नियुक्ती केली आहे. आगामी सणासुदीच्या कालखंडात विविध मंडळांतर्फे उत्सव साजरे केले जातील. त्या अनुषंगाने उभारण्यात येणाऱ्या मंडपांची तपासणी करुन त्याचा अहवाल देण्याची जबाबदारी या पथकांवर सोपविण्यात आली आहे.

उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार महानगरपालिका क्षेत्रामध्ये सार्वजनिक सण, उत्सव, समारंभासाठी उभारण्यात येणाऱ्या मंडप तपासणीबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तहसीलदार, नायब तहसीलदार अथवा त्यावरील अधिकाऱ्यांच्या गठित मंडप तपासणी पथकातर्फे उत्सव सुरु होण्यापूर्वी मंडप तपासणी करुन त्याचा अहवाल संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यांकडे आवश्यक कार्यवाहीसाठी सादर करणे आवश्यक आहे. यानुसार मुंबई शहरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 3 समिती व 9 पथकांची नियुक्ती केली आहे.

विभागनिहाय तपासणी पथके

ए विभाग – मीनल दळवी, तहसीलदार तथा रचना व  कार्यपध्दती अधिकारी, मुंबई शहर (दुरध्वनी क्र. 22665233, भ्रमणध्वनी क्र. 9324213025, ई मेल magcollectormumbaicity@gmail.com)

बी विभाग – प्रसाद कालेकर, नायब तहसीलदार, मलबार हिल विधानसभा मतदार संघ, (दुरध्वनी क्र. 22665233, भ्रमणध्वनी क्र. 8308037954, ई मेल magcollectormumbaicity@gmail.com),

ई विभाग – प्रकाश भोसले, नायब तहसीलदार निवडणूक शाखा (दुरध्वनी क्र. 22665233, भ्रमणध्वनी क्र. 9892363373, ई मेल magcollectormumbaicity@gmail.com),

सी विभाग – अश्विनकुमार पोतदार, तहसीलदार करमणूककर वसुली शाखा (दुरध्वनी क्र 22665233, भ्रमणध्वनी क्र.  7588813400, magcollectormumbaicity@gmail.com)

डी विभाग – अशोक सानप, नायब तहसीलदार, अति/निष्का धारावी विभाग, (दुरध्वनी क्र. 22665233, भ्रमणध्वनी क्र.  9967977259  magcollectormumbaicity@gmail.com)

 जी विभाग – एम. आर. वारे, वरळी विधानसभा मतदार संघ, (दुरध्वनी क्र. 22665233, भ्रमणध्वनी क्र.  7038430195, ई मेल  magcollectormumbaicity@gmail.com),

एफ नॉर्थ विभाग – एम आर जाधव, नायब तहसीलदार सायन कोळीवाडा विधानसभा मतदार संघ, दुरध्वनी क्र. 22665233, भ्रमणध्वनी क्र. 9404987473  magcollectormumbaicity@gmail.com),

जी नॉर्थ विभाग – श्याम सुरवसे,  तहसीलदार, निवडणूक शाखा, (दुरध्वनी क्र. 22665233, भ्रमणध्वनी क्र.   9881108916  magcollectormumbaicity@gmail.com),

एफ साऊथ विभाग  – आशा तामखेडे, तहसीलदार जमीन महसूल वसूली शाखा, (दुरध्वनी क्र. 22665233, भ्रमणध्वनी क्र.  9137773090  magcollectormumbaicity@gmail.com)Team DGIPR | ऑगस्ट 21, 2020 येथे 5:36 pm | Tags: मुंबई महापालिका | Categories: वृत्त वि

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web