प्रतिनिधी.
डोंबिवली – डोंबिवली पूर्व येथील जिमखान्याच्या बास्केट बॉल कोर्टाच्या जागेवर उभारलेल्या कोविड रुग्णालयाचाआज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन लोकर्पण सोहळा संपन्न झाला .यावेळी पालक मंत्री एकनाथ शिंदे ,खासदार श्रीकांत शिंदे,महापौर विनिता राणे,आमदार रवींद्र चव्हाण ,पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89 टक्के असून ठाणे शहर देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर कल्याण डोंबिवली मध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85 टक्के असून हे शहर राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे ही दिलासादायक बाब असून चांगले संकेत आहेत .